Finance App

12% Club App अँप माहिती: 12% म्हणजे काय,सुरक्षित आहे का, खाते कसे उघडायचे

नमस्कार मित्रांनो, आज आपण 12% Club अँप म्हणजेच 12 Club Bharatpe या बद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. यात आपण 12% क्लब अँप बद्दल माहिती जाणून घेण्यासोबतच यात इन्व्हेस्ट कसे करायचे, त्याची नियम व अटी, फायदे व तोटे या अश्या सर्व गोष्टीं बद्दल आज आपण सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो, तुम्हाला ही गुंतवणूक करायला आवडते का? तुम्हाला ही वैयक्तिक कर्ज घ्यायचे आहे का? जर तुमचं उत्तर ‘हो’ असेल, तर हा लेख फक्त तुमच्यासाठी आहे. कारण भारत पे ने आता तुम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली आहे. भारत पे ने 12% क्लब अँप द्वारे तुम्हाला गुंतवणूक करण्यासाठी व कर्ज घेण्यासाठी एक प्रभावी माध्यम उपलब्ध करून दिले आहे. या अँप द्वारे तुम्ही 12% वार्षिक व्याज दराने कर्ज घेऊ शकता किंवा जर तुम्हाला या अँप मध्ये पैसे गुंतवायचे असतील तर तुम्ही 12% वार्षिक दराने कर्ज देऊ ही शकता व 12 टक्के व्याजदराने परतावा मिळवू शकता. आता या अँप बद्दल आपण सविस्तर पणे जाणून घेऊ या.



12% Club App information in Marathi

12% क्लब अँप म्हणजे काय ?

What is 12% club by Bharatpe

सर्वात पहिले 12% क्लब अँप म्हणजे नेमकं काय आहे, ते जाणून घेऊ या

मित्रांनो, 12% क्लब अँप हे भारत पे चे एक विश्वासार्ह असे वैयक्तिक गुंतवणूक अँप आहे. जिथे तुम्ही तुमच्या काही आर्थिक गरजांसाठी वार्षिक 12% व्याजदराने कर्ज देऊ शकता किंवा घेऊ शकता. या अँप वर तुम्ही तुमचे पैसे उधार ही देऊ शकता आणि त्या रकमेवर वार्षिक 12% व्याज मिळवू शकता. यात व्याज दररोज (Daily) दिला जातो. जो तुम्ही कधीही काढू शकता. याशिवाय जर तुम्हाला काही आर्थिक अडचण असेल आणि त्यासाठी तुम्हाला जर रोख कर्ज घ्यायचे असेल तर या अँप वर तुम्हाला कर्जदार म्हणून साइन अप करावे लागेल व त्यासाठी वैयक्तिक कर्जासाठी अर्ज भरावा लागेल.

उदाहरण: समजा तुम्ही 1 लाख वर्षासाठी गुंतवले तर तुम्हाला 12% व्याज दराने तुम्हाला 12,000 रुपये मिळतील आणि दिवसाला तुम्हाला 32.88 रुपये अँपच्या अकाउंट मध्ये रोज (daily) जमा होतील. हे व्याजाचे पैसे तुम्ही कधीही काढू शकता. तसेच समजा तुम्हाला कर्ज घ्यायचे असेल तर तुम्हाला 12% व्याजदराने मिळू शकते.

मित्रांनो, या अँप मध्ये जर तुम्ही पैसे गुंतवले तर तुम्हाला तुमच्या खात्यात रोजच्या रोज व्याजचे पैसे क्रेडिट होतात. आणि ही रक्कम तुम्ही कधीही काढू शकता. तुमच्या मुदत ठेवी (FD) आणि इतर इक्विटीच्या (शेअर मार्केट गुंतवणूक) तुलनेत तुम्हाला इथे जास्त परतावा मिळतो. त्यामुळे तुमच्या मेहनतीचा पैसा जर तुम्हाला वाढवायचा असेल आणि जर तुम्ही त्यासाठी एखादे सुरक्षित ठिकाण शोधत असाल तर 12% क्लब अँप एक बेस्ट ठिकाण आहे.



12% क्लब अँप वर खाते कसे उघडायचे

How To Open 12% Club Account By BharatPe

स्टेप 1: मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला 12% क्लब अँप प्ले स्टोअर वरून डाउनलोड करून इन्स्टॉल करायचे आहे.

12% क्लब अँप डाउनलोड व इन्स्टॉल करण्यासाठी लिंक =>12% क्लब: गुंतवणूक करा किंवा कर्ज घ्या 12% दराने<=

12% Club App Var Account Open Kase Karayche Step 1

स्टेप 2: आता अँप उघडून तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे व Continue बटन वर क्लिक करायचे आहे, नंतर मोबाइल वर आलेला OTP टाकून परत Continue बटन वर क्लिक करायचे आहे.

12% Club App Var Account Open Kase Karayche Step 2

स्टेप 3: आता तुमचे 12% क्लब अँप वर तुमचे अकाउंट उघडले गेले आहे, आता तुम्हाला केवायसी (KYC) पूर्ण करायची आहे, त्यासाठी तुम्हाला अँप च्या होम पेज वर असलेल्या Add money या बटन वर क्लिक करायचे आहे.

12% Club App Var Account Open Kase Karayche Step 3

स्टेप 4: आता तुम्हाला बँक अकाउंट लिंक करायचे आहे, त्यासाठी Link Now बटन वर क्लिक करा. नंतर तुमची बँक निवडायची आहे.

12% Club App Var Account Open Kase Karayche Step 4

स्टेप 5: आता पुढच्या पेज वर तुमच्या मोबाइलला लिंक असलेले बँक अकाउंट ऑटोमॅटिक निवडले जाईल आणि जर तुमच्या मोबाइलला बँक अकाउंट लिंक नसेल तर तुम्ही स्वतः बँकेचे डिटेल्स टाकून ते करू शकता, त्यासाठी Add Account Manually ऑपशन वर क्लिक करायचे आहे.

नंतर तुम्हाला तुमचा पॅन कार्ड नंबर मागितला जाईल, तो टाकून Continue बटन वर क्लिक करायचे आहे.

12% Club App Var Account Open Kase Karayche Step 5

स्टेप 6: अशा तर्हेने तुमचे बँक आणि पॅन व्हेरिफाय झालेले आहे. आता शेवटची स्टेप बाकी आहे यात तुम्हाला आधार कार्डच्या मदतीने तुमची KYC पूर्ण करायची आहे. त्यासाठी Add Aadhaar बटन वर क्लिक करायचे आहे.

12% Club App Var Account Open Kase Karayche Step 6

स्टेप 7: आता तुमचा आधार नंबर टाकून कॅप्चा टाकायचा आहे व Next बटन वर क्लिक करायचे आहे. आता आधार लिंक मोबाइल नंबर वर OTP येईल तो बॉक्स मध्ये टाकून Continue बटन वर क्लिक करायचे आहे.

12% Club App Var Account Open Kase Karayche Step 7

स्टेप 8: जर तुम्ही डिजिलॉकर वर रजिस्टर असाल तर तुम्हाला त्याचा सहा अंकी पिन टाकायचा आहे आणि जर पिन विसरला असाल तर Forgot security PIN? ऑपशन वर क्लिक करून तो रीसेट करायचा आहे. नंतर allow बटन वर क्लिक करायचे आहे. अशा प्रकारे तुमची आधार KYC पूर्ण झाली.

12% Club App Var Account Open Kase Karayche Step 8

स्टेप 9: आता पुढच्या पेज वर तुमच्या आधारला लिंक तुमची माहिती दिसेल आता शेवटी Take Selfie बटन वर क्लिक करून तुम्हाला तुमची सेल्फी काढायची आहे. आणि शेवट तुम्हाला अँपच्या टर्म आणि कंडिशन Accept बटन वर क्लीक करून मान्य करायच्या आहेत.

12% Club App Var Account Open Kase Karayche Step 9

12% क्लब अँप वर पैसे कसे गुंतवायचे

How to Invest in 12% Club App

मित्रांनो, तुम्हाला जर 12 क्लब अँप वर पैसे कसे गुंतवायचे हे जाणून घ्यायचे असेल तर खालील स्टेप्स फॉलो करा. (सविस्तर माहितीसाठी वरचा अकाउंट उघडण्याचा पॉईंट वाचा)

How to invest in 12% Club App Step 2

स्टेप 3: त्यानंतर तुम्हाला जेवढी रक्कम गुंतवायची आहे ती रक्कम Enter Amount ठिकाणी Add Money बटन वर क्लिक करायचे आहे. (इथे तुम्ही 1000 ते 10 लाख रुपये पर्यंत रक्कम टाकू शकता.) आणि थोडे खाली Investment ऑपशन मध्ये तुम्हाला रोज किती व्याज मिळेल त्याची माहिती दिसेल.

How to invest in 12% Club App Step 3

स्टेप 4: त्यानंतर पैसे ऍड करण्यासाठी तुम्हाला काही पेमेंट ऑप्शन दिले जातील. जसे की UPI, नेट बँकिंग, डेबिट कार्ड वगैरे. यापैकी एक पर्याय निवडून Pay बटन वर क्लिक करायचे आहे.

How to invest in 12% Club App Step 4

स्टेप 5: आता तुमचे पैसे 12% क्लब अँप मध्ये सकसेसफुल्ली जोडले जातील. तसा तुम्हाला मेसेज ही येईल. व दुसऱ्या दिवसापासूनच तुम्हाला व्याज मिळण्यास सुरुवात होईल.

How to invest in 12% Club App Step 5

12 क्लब अँप वर कर्ज कसे घ्यावे

मित्रांनो तुम्हाला जर 12 क्लब अँप वर कर्ज घ्यायचे असेल तर खालील स्टेप्स फॉलो करा…

स्टेप 1: तुम्हाला सर्वात आधी तुमची केवायसी (KYC) प्रक्रिया पूर्ण करायची आहे. (सविस्तर माहितीसाठी वरचा अकाउंट उघडण्याचा पॉईंट वाचा)

स्टेप 2: त्यानंतर होम पेज वर तुम्हाला Add money आणि Take money असे दोन ऑप्शन दिसतील. त्यातील Take money या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

स्टेप 3: आता तुमची केवायसी पुन्हा चेक केली जाईल व तुम्हाला किती रक्कम हवी आहे ते विचारले जाईल.

स्टेप 4: तुम्हाला जेवढी रक्कम हवी आहे ती टाकून Proceed बटन वर क्लिक करायचे आहे.

स्टेप 5: त्या नंतर तुम्हाला ज्या बँक खात्यावर कर्जाची रक्कम हवी आहे त्या बँकचा खाते क्रमांक द्यायचा आहे.

स्टेप 6: सर्व तपासणी झाल्यानंतर तुमच्या कर्जाची रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा केली जाईल.

12% क्लब अँपमध्ये केलेली गुंतवणूक सुरक्षित आहे का?

Is the 12% Club App Safe to Invest Money

मित्रांनो, 12% क्लब ने RBI मान्यताप्राप्त NBFCs – hindon mercantile limited, LendenClub (Innofin Solutions Private Limited) आणि Liquiloans (NDX P2P प्रायव्हेट लिमिटेड) सह भागीदारी केली आहे. तसेच तुम्ही कर्जाची निवड केल्यावर तुम्हाला अँप वर NBFC चे मंजुरी पत्र दाखवले जाईल आणि जेव्हा तुम्ही पैसे गुंतवायचे सिलेक्ट करता तेव्हा तुम्हाला भागीदारीचे ऍग्रीमेंट ही दाखवले जाईल.

12% क्लब अँप पीटूपी (P2P) कर्ज प्रकारावर चालते. यात लोकांकडून गोळा केलेले पैसे विविध लोकांना कर्जाच्या रुपात दिले जातात.

मित्रांनो, भारत पे चे 12% क्लब अँप तुमची सर्व वैयक्तिक माहिती विचारते व ती जपून ठेवते. ही माहिती विचारण्याचे मुख्य कारण म्हणजे सरकारच्या आर्थिक कायद्यानुसार अँप वापरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची, कर्ज घेतलेल्या व्यक्तीची वैयक्तिक माहिती ही अँपच्या डेटाबेस मध्ये असणे आवश्यक आहे.

मित्रांनो, या अँपच्या गोपनीयता धोरण मध्ये अँप ने हे मान्य केले आहे की कोणत्याही वापरकर्त्याची वैयक्तिक माहिती ही कोणाशीही शेअर केली जाणार नाही तसेच ही माहिती कोणत्याही परिस्थितीत लीक केली जाणार नाही. हे अँप भारत पे द्वारे चालविले जाते त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. तसेच ते RBI द्वारे ही प्रमाणित केलेले आहे. त्यामुळे 12% क्लब अँप सुरक्षित आहे असे म्हणायला हरकत नाही.

12 क्लब अँप मधील गुंतवणूक किती सुरक्षित आहे ?

मित्रांनो, तुम्ही जर 12% क्लब अँप मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर, गुंतवणूक केलेले पैसे सुरक्षित राहतील का ? असा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच आला असेल. खरंतर हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तसे पाहिलं तर प्रत्येक गोष्टीत रिस्क तर ही असतेच. त्यातल्या त्यात इथे तुम्हाला 12 टक्के व्याज दिले जाते म्हणजे थोडीफार रिस्क तर असणारच यात शंका नाही. याचे महत्वाचे कारण म्हणजे ज्या व्यक्तीला तुमचे पैसे कर्ज म्हणून दिले आहे ती व्यक्ती जर डिफॉल्टर निघाली किंवा जर त्या व्यक्तीने कर्जाची रक्कम परतफेड केली नाही तर मात्र तुम्हाला नुकसान होऊ शकते. अश्या परिस्थितीत तुम्ही केलेली गुंतवणूक असुरक्षित ठरू शकते.

पण मित्रांनो, अशी रिस्क तर इतर ठिकाणी म्हणजे इतर बचत योजनां मध्येही बघायला मिळते. पण या 12% क्लब अँप मध्ये तुम्ही गुंतवलेली पूर्ण रक्कम फक्त एका व्यक्तीला दिली जात नाही तर ती थोडी थोडी अनेक व्यक्तींना कर्ज म्हणून दिली जाते. आणि प्रत्येक जण काही डिफॉल्टर नसतो. त्यामुळे अश्या वेळेस तुमची गुंतवणूक सुरक्षित राहते. व तुम्हाला 12% व्याजदराने तुमच्या गुंतवणूकीवर व्याज मिळत राहते.

तसेच तुमच्या गुंतवणूकिला आणखीन सुरक्षित ठेवायचे असेल तर तुम्ही पूर्ण रक्कम एकाच वेळेस गुंतवू नका. वेग-वेगळ्या दिवशी गुंतवा जेणेकरून तुमची रक्कम वेगवेगळ्या लोकांकडे जाईल व तुम्हाला सुरक्षितता मिळेल. तसेच 12% क्लब अँप लोकांना कर्ज देण्याआधी त्यांचे क्रेडिट स्कोर चेक करते. या शिवाय हे अँप कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचे मागील सर्व व्यवहार चेक करून बघते आणि मगच कर्ज देते. त्यामुळे डिफॉल्ट होण्याचे चान्सेस खूप कमी असतात.(3% पेक्षा कमी).

12% क्लब अँपचे फायदे काय आहेत?

  1. इतर बचत योजनांच्या किंवा बँकेच्या तुलनेत 12% क्लब अँप वर व्याज जास्त दिले जाते.
  2. कुठेही न जाता घरात बसून तुम्ही गुंतवणूक करू शकता. तसेच घर बसल्या तुम्ही गुंतवलेली रक्कम कधीही काढू शकता.
  3. या अँपची चांगली गोष्ट म्हणजे इथे तुम्हाला दररोज व्याज मिळते.
  4. इथे कोणताही टीडीएस कापला जात नाही.
  5. तुम्ही दिवसा किंवा रात्री कधीही कर्जाची प्रक्रिया पूर्ण करू शकता.
  6. या अँपच्या मदतीने तुम्ही QR कोड तयार करून तुमचे पैसे काढू शकता.

12% क्लब अँपचे तोटे काय आहेत?

मित्रांनो, प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. तसेच फायदे असतील तर तोटे पण असणारच. चला तर मग 12% क्लब अँप चे तोटे काय आहेत ते बघू या…

  1. या अँप मध्ये तुम्हाला 10 लाख पेक्षा जास्त रक्कम कर्ज म्हणून मिळू शकत नाही.
  2. तुमचा क्रेडिट स्कोर चांगला नसेल तर तुम्हाला कर्ज मिळत नाही.
  3. तसेच या अँप मध्ये तुम्ही 1000 पेक्षा कमी गुंतवणूक करू शकत नाही.
  4. या अँप मध्ये गुंतवणूक करण्यात थोडी रिस्क असते.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण 12% क्लब अँप बद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली आहे. मित्रांनो, 12% क्लब अँप मध्ये गुंतवणूक करणे फायद्या चेच ठरेल फक्त तुम्हाला थोडी रिस्क घेण्याची तयारी ठेवावी लागेल. रिस्क म्हटलं म्हणून घाबरून जायची गरज नाही. फक्त गुंतवणूक करण्याआधी तुमचे सगळे पैसे एकाच ठिकाणी गुंतवू नका. तर मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हाला आवडला असल्यास किंवा महत्व पुर्ण वाटलं असल्यास तूमच्या मित्र मंडळी सोबत नक्की शेअर करा.
धन्यवाद

FAQ

12% क्लब अँप मध्ये कमीत कमी व जास्तीत जास्त किती गुंतवणूक करू शकतो?

मित्रांनो, या अँप मध्ये तुम्ही कमीत कमी 1000 रुपये व जास्तीत जास्त 10 लाख पर्यंत गुंतवणूक करू शकता.

12% क्लब अँप सुरक्षित व कायदेशीर/लीगल आहे का?

होय. मित्रांनो 12% क्लब अँप हे भारत पे द्वारे चालविले जाते. तसेच ते RBI द्वारे प्रमाणित असल्याने हे एक सुरक्षित अँप आहे.

12% क्लब अँप मध्ये गुंतवणूक करण्यास किती रिस्क आहे?

मित्रांनो, तशी रिस्क तर प्रत्येक गुंतवणूकीत असते. 12% क्लब अँप मध्ये तुम्हाला रिस्क तेव्हाच असते जेव्हा कर्जदार डिफॉल्ट करतात. म्हणजे कर्ज रक्कम परतफेड करत नाहीत. पण हे अँप दावा करते की त्यांचे डिफॉल्ट दर हे खूप कमी आहेत (3% पेक्षा कमी). आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हे अँप तुम्ही गुंतवलेली रक्कम एकाच व्यक्तीला न देता, अनेकांना दिली जाते. त्यामुळे डिफॉल्ट चा गुंतवणूक दाराच्या परताव्यावर कोणताही परिणाम होत नाही.

12% क्लब अँप मध्ये किती व्याज मिळते?

मित्रांनो, या अँप मध्ये 12% व्याज दर मिळते.

12% क्लब अँप ला RBI ने मान्यता दिली आहे का?

मित्रांनो, 12% क्लब ने RBI मान्यताप्राप्त NBFCs – hindon mercantile limited, LendenClub (Innofin Solutions Private Limited) आणि Liquiloans (NDX P2P प्रायव्हेट लिमिटेड) सह भागीदारी केली आहे. तसेच तुम्ही कर्जाची निवड केल्यावर तुम्हाला अँप वर NBFC चे मंजुरी पत्र दाखवले जाईल आणि जेव्हा तुम्ही पैसे गुंतवायचे सिलेक्ट करता तेव्हा तुम्हाला भागीदारीचे ऍग्रीमेंट ही दाखवले जाईल.

12% क्लब अँप वर खाते उघडण्यासाठी कोण कोणते कागदपत्रे असणे आवश्यक आहे

मित्रांनो, 12 क्लब अँप वर खाते उघडण्यासाठी तुम्हाला तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड, तुमचे बँक डिटेल्स आणि तुमचा सेल्फी एवढया गोष्टी लागतात.

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!